मुंबई:- चेंबूरच्या माजी काँग्रेस नगरसेविका सीमाताई माहुलकरांना मातृशोक।

मुंबई:- चेंबूरच्या  माजी काँग्रेस  नगरसेविका सीमाताई  माहुलकरांना मातृशोक।



मुंबई - चेंबुरच्या माहुल गाव परिसरातील  काँग्रेस  पक्षाच्या  माजी नगरसेविका  सौ. सीमाताई  राजेंद्र माहुलकर यांच्या  मातोश्री स्वर्गीय कुसुम चंद्रकांत  माहुलकर यांचे  आकस्मित निधन  झाले. त्या 69 वर्षाच्या  होत्या . त्यांच्या निधनामुळे  संपूर्ण  माहुलगाव व चेंबुर  परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.


अतिशय  मनमिळाऊ आणि प्रेमळ  स्वभावाच्या असलेल्या  स्वर्गीय कुसुम चं  माहुलकर  यांच्या  पश्चात दोन मुले व मुलगी  सौ. सीमाताई   माहुलकर असा परिवार आहे. तसेच त्यांचे जावई  मा. नगरसेवक राजेंद्र माहुलकर हे देखील चेंबुरमधील  नावाजलेले व्यक्तीमत्व  आहे. स्वर्गीय कुसुम चंद्रकांत  माहुलकर यांचा बारावा  विधी बुधवार 20 आॕक्टोंबर रोजी  त्यांच्या माहुलगाव येथील निवासस्थानी होणार आहे.

Post a Comment

0 Comments